Friday, May 22, 2020


एक पुला वरचा इंडिया आणि दुसरा पुला खालचा भारत 🇮🇳
एक उपभोगतोय सक्तीच्या सुट्टीची मजा
तर
दूसरा भोगतोय सक्तीच्या सुट्टीची सजा
एक इंडिया आहे,
जो आपल्या सुरक्षित, उबदार घरात 'home sweet home' आनंदानं गुणगुणतोय..
आणि
एक भारत आहे,
जो 'survival of fittest' साठी उन्हातान्हात उपाशीपोटी मैलोनमैल पायी तुडवत निघालाय..
नाहीच जगलो अगदी तर किमान मृत्यु यावा मायदेशी या अट्टहासापोटी...
एक इंडिया आहे,
ज्यांनी रोज रोज नवीन पदार्थ करण्याची शर्यत लावली आहे,
लाॅकडाऊन हा जणू सण म्हणून साजरा करून दाखवतो आहे,
आपल्याच जिभेच्या चोचल्यांचं कौतुक करून घेतो आहे..
एक भारत आहे,
ज्याने वाटीभर भातासाठी हात पसरून रांग लावली आहे,
आठ पोरांमध्ये एक भाकरी माऊली तुकडे करून वाटते आहे,
आलीच मदत तर ठीक नाहीतर घटाघटा पाणी पिऊन पोट भरतो आहे,
पोटातल्या भुकेचा आगडोंब मारत महामारीच्या नावाने कडाकडा बोटं मोडतं आहे...
एक इंडिया आहे,
जो संध्याकाळी गॅलरीत येऊन चिमण्यांचा चिवचिवाट ऐकतो आहे,
कोरोनाचा आकडा किती वाढला किती घटला काऊंट ठेवतो आहे,
घरात बसून वजन वाढलं म्हणून हसत हसत तक्रार करतो आहे..
एक भारत आहे,
जो दहा बाय दहाच्या खोलीत दहा लोकांसोबत घाबरत घाबरत श्वास घेतो आहे,
देणाऱ्याच्या दयेवर कसाबसा जगतो आहे,
सुटलेल्या कामाची भ्रांत घेऊन पोरांच्या खपाटीला गेलेल्या पोटाकडे हतबलतेने बघतो आहे,
हातावरचं जगणं रोज जगवायचं कसं ह्या विचाराने खचतो आहे..
या देशात दोन भारत आहेत..
एक पुलावरचा इंडिया आणि एक पुलाखालचा भारत आहे..
कोरोनामुळे दोघे त्रस्त आहेत,
फरक इतकाच आहे,
एकाला सक्तीच्या सुट्टीची मजा मिळाली आहे
तर,
दुसऱ्याला सक्तीच्या सुट्टीची सजा मिळते आहे..c
Help at list one around you..


No comments:

Post a Comment

एक पुला वरचा इंडिया आणि दुसरा पुला खालचा भारत एक उपभोगतोय सक्तीच्या सुट्टीची मजा तर दूसरा भोगतोय सक्तीच्या सुट्टीची सजा ...