Friday, May 22, 2020


एक पुला वरचा इंडिया आणि दुसरा पुला खालचा भारत 🇮🇳
एक उपभोगतोय सक्तीच्या सुट्टीची मजा
तर
दूसरा भोगतोय सक्तीच्या सुट्टीची सजा
एक इंडिया आहे,
जो आपल्या सुरक्षित, उबदार घरात 'home sweet home' आनंदानं गुणगुणतोय..
आणि
एक भारत आहे,
जो 'survival of fittest' साठी उन्हातान्हात उपाशीपोटी मैलोनमैल पायी तुडवत निघालाय..
नाहीच जगलो अगदी तर किमान मृत्यु यावा मायदेशी या अट्टहासापोटी...
एक इंडिया आहे,
ज्यांनी रोज रोज नवीन पदार्थ करण्याची शर्यत लावली आहे,
लाॅकडाऊन हा जणू सण म्हणून साजरा करून दाखवतो आहे,
आपल्याच जिभेच्या चोचल्यांचं कौतुक करून घेतो आहे..
एक भारत आहे,
ज्याने वाटीभर भातासाठी हात पसरून रांग लावली आहे,
आठ पोरांमध्ये एक भाकरी माऊली तुकडे करून वाटते आहे,
आलीच मदत तर ठीक नाहीतर घटाघटा पाणी पिऊन पोट भरतो आहे,
पोटातल्या भुकेचा आगडोंब मारत महामारीच्या नावाने कडाकडा बोटं मोडतं आहे...
एक इंडिया आहे,
जो संध्याकाळी गॅलरीत येऊन चिमण्यांचा चिवचिवाट ऐकतो आहे,
कोरोनाचा आकडा किती वाढला किती घटला काऊंट ठेवतो आहे,
घरात बसून वजन वाढलं म्हणून हसत हसत तक्रार करतो आहे..
एक भारत आहे,
जो दहा बाय दहाच्या खोलीत दहा लोकांसोबत घाबरत घाबरत श्वास घेतो आहे,
देणाऱ्याच्या दयेवर कसाबसा जगतो आहे,
सुटलेल्या कामाची भ्रांत घेऊन पोरांच्या खपाटीला गेलेल्या पोटाकडे हतबलतेने बघतो आहे,
हातावरचं जगणं रोज जगवायचं कसं ह्या विचाराने खचतो आहे..
या देशात दोन भारत आहेत..
एक पुलावरचा इंडिया आणि एक पुलाखालचा भारत आहे..
कोरोनामुळे दोघे त्रस्त आहेत,
फरक इतकाच आहे,
एकाला सक्तीच्या सुट्टीची मजा मिळाली आहे
तर,
दुसऱ्याला सक्तीच्या सुट्टीची सजा मिळते आहे..c
Help at list one around you..


 
 Pic.credit-
Amol Unecha
 
 
"मरम्मत चल रही है जिंदगी की जनाब
उठेंगे जल्द ही बड़ा तूफान लेकर.."
Lockdown च्या काळात आकाश कितीही clean झाले असले तरीही घरापासून लांब असलेल्यांना त्यांचे घर दिसत नाही .
' ३ में ला lockdown उठेल आणि आपण आपल्या घरी जाऊ .' घरापासून लांब अडकलेल्या सर्वांचे plan सद्धया तरी पूर्ण होईल असे वाटेना . कामानिमित्त इतर राज्यात गेलेले सर्व लोकं, आपण एखाद्या संकटात सापडलो असाच विचार करत असतील.
मागील कितीतरी दिवसांपासून ३ मे ची आतुरतेने वाट पाहणारी ही मंडळी एका क्षणात हताश झाली . यात दोष कुणाचा काही कळेना . प्रशासन ही शेवटी लोकांना वाचविण्यासाठीच हे सर्व करत आहे. पण मला असे वाटते की परदेशातून आपण आपल्या लोकांना आणले तसेच इथल्या लोकानांही त्यांच्या घरी पोहचविण्याची नैतिक जबाबदारी कुणीतरी घ्यावी आणि तेही लवकर . हा श्रीमंताचा तसाच गरीबांचाही देश आहे . या देशाच्या प्रगतीचे इंजिन श्रीमंतांचे जरी असले तरी त्याचे चाकं हे श्रमिक च आहेत.
No matter how clear the sky is during the lockdown, their home is not visible when they are far from home.
'The lockdown will end on the 3rd and we will go home.' The plan of everyone stuck far from home did not seem to be fulfilled at the moment. People who have gone to other states for work may think that they are in trouble.The church, which had been anxiously awaiting May 3 for the past several days, became desperate in an instant.
No one knew who was at fault. The administration is doing all this to save the people in the end. But I think someone should take the moral responsibility of bringing our people from abroad as well as the people here to their homes, and pretty soon. It is a country of the rich as well as the poor. Although the engine of progress of this country belongs to the rich, its wheels are the workers.


खानु ... जिथे पुणे संपतो .
चांदर ला काम करत असतांना खानु ला खुप वेळा गेलो. कधी दत्त जयंती ला तर कधी नुसतं फिरायचं म्हणुन .
चांदर पासुन खानु ला पायी जायचं असल्यास एक -दिड तास तरी लागतो. (माझ्या सारख्या आळशी माणसाला दोन तास)
खानु म्हणजे पुण्याचं शेवटच टोक. येथे पुणे संपतो आणि रायगड जिल्हा सुरु होतो. किल्ले रायगड, लिंगाणा या ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन ही आपल्याला या भागातून करता येते.
खानु गाव तालुक्याच्या ठिकाणापासुन अलिप्तच , त्यामुळे या ठिकाणी पोहचणे एक दिव्यच.
या Lockdown च्या काळात येथील कुटुंबांना मदत व्हावी या हेतुने नेहमीप्रमाणेच अवचित मारुती ट्रेक्कींग ग्रुप पुढे सरसावला आहे.पुनित बालन ग्रुप यांनी महत्वाची भुमिका यात बजावली आहे.
आज या गावातील लोकांना भेटून आम्ही सर्व खुप आनंदी आहोत.
ज्यांना खरी गरज आहे त्यांच्या पर्यंत पोहचु शकलो यापेक्षा दुसरे समाधान नाही.
🚩घोगटीवस्ती- चांदर गावाची एक छोटीशी वाडी. हे ४-५ कुटुंबाचे ही वाडी.मुख्य गावापासुन अलिप्त असल्याने अनेक गोष्टीपासुन वंचित आहे. आज याठिकाणी ही पोहचता आले. गावातील विठ्ठल राव आमचे मित्र. सहसा त्यांच्याकडे असे कुणी येत नाही.आम्ही त्यांच्याकडे पोहचतात त्यांच्या चेह-यावरील हास्य खुप काही सांगुन गेलं.
Khanu ... where Pune ends.
I went to Khanu a lot of times while I was working at Chandar. Sometimes on Datta Jayanti and sometimes just for a walk.
It takes at least an hour and a half to walk from Chandar to Khanu. (Two hours to a lazy man like me)
Khanu is the last point of Pune. Here Pune ends and Raigad district begins. You can see the view of historical forts of Raigad and Lingana from this area.
Khanu village is detached from the taluka, so it is a miracle to reach this place.
As usual, the Awchit Maruti Trekking Group has stepped forward to help the families here during this lockdown.
Thank you Balan Group for providing all the things.
We are all very happy to meet the people of this village today.
There is no better satisfaction than to reach those who really need it.
Ghogativasti- A small wadi of Chandar village. We had an amazing view of Lingana from this village. This is a village of 4-5 families. Being detached from the main village, it is deprived of many things. I was able to reach here today. Vitthal Rao from the village is our friend. The smiles on his face as we approached him said a lot.
Thank you
Punit Balan
& Group for all your support.
 









 
सद्ध्या कोराना विषाणु संसर्गामुळे संपूर्ण जग होरपळुन निघत आहे. आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिका असो की वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज इटली सर्व च या रोगापुढ़े हतबल झाले आहेत.
आपला देश कोरोनाशी धैर्याने लढतो आहे.
आपल्या वेल्हे तालुक्यातही काही रुग्ण आढ़ळले आहेत . पुढच्या संकटाची दक्षता म्हणून मा. तहसीलदार श्री . शिवाजी शिंदे साहेब यानी वेल्हे तालुक्यात १०० बेड चे स्पेशल कोविड सेंटर स्थापन करण्याचे ठरविले आहे . याविषयी मी स्वप्नील दादा आणि अजय दादा यांच्याशी चर्चा केली होती . याला प्रतिसाद म्हणुन स्वप्निल दादा जे सद्ध्या सिंगापूर या देशात राहतात यांनी आणि मित्रांनी मिळुन कोविड सेंटर साठी १५ बेड ची मदत केली आहे तर अजय दादा जे सदध्या अमेरिकेत राहतात यांनी ५ बेड ची मदत केली आहे . परदेशात राहूनही आपल्या देशातील लोकांविषयी काळजी बाळगणा-या मित्रांना मनापासून धन्यवाद.🙏😊
               🙏टिम- अवचित मारुती ट्रेकींग ग्रुप🙏
Currently, the whole world is suffering from the Corona virus. Whether it is the US, a financial superpower, or Italy, which is equipped with medical facilities, all are vulnerable to this disease.
Our country is fighting bravely against Corona. Some patients have also been found in our Velhe taluka. As a precaution against the next crisis, Hon. Tehsildar Shri. Shivaji Shinde has decided to set up a special covid center of 100 beds in Velhe taluka. I had discussed this with Swapnil Dada and Ajay Dada.
In response, Swapnil Dada, who currently lives in Singapore, and friends have donated 15 beds for the Covid Center, while Ajay Dada, who currently lives in the US, has donated 5 beds. Thank you from the bottom of my heart to both of you who care about the people of our country even while living abroad.🙏😊



एक पुला वरचा इंडिया आणि दुसरा पुला खालचा भारत एक उपभोगतोय सक्तीच्या सुट्टीची मजा तर दूसरा भोगतोय सक्तीच्या सुट्टीची सजा ...